बाबांसाठी मराठी कविता,चारोळी आणि शायरी


 बाबा 


बाबा हा शब्द ऐकल्यावर एक नकळत अशी आदर,प्रेम अश्या भावना निर्माण होतात.जो स्वतापेक्षा जास्त आपल्या मुलांबद्दल विचार करतो तो म्हणजे बाप असतो. अश्या बापा बद्दल जेवड लिहाव तेवड कामीच आहे . मला जेवड जमेल तेवड लिहण्याचा प्रयत्न केला आहे तरी मला आपण comment  करून आपल्या कविता सांगा म्हणजे मी त्या आपल्या प्रेक्षकांपर्यन्त पोहचवण्याचे काम करीन आणि यामुळे आमच्या संग्रहात भर पडेल. स्वत: टपरा मोबाईल वापरुन,

तुम्हाला स्टायलिश मोबाईल,

घेऊन देतो, तुमच्या प्रीपेडचे पैसै

स्वत: भरतो, तुमचा आवाज ऐकण्यासाठी

जो आसुसलला असतो तो माझा बाप असतो,हॅपी फादर्स डे!


#वडील चारोळ्या


ज्यांचा नुसता खांद्यावर

हात जरी असला,

तरी समोरच्या संकटांना,

लढा देण्याची प्रेरणा मिळते,

अशा माझ्या बाबांना, हॅपी फादर्स डे!


बाबा वर कविता#बाप मराठी कविता
कोण म्हणतो बापाचा धाक असतो मुलांवर

अरे दिसत नाही पण मायेच्या ममतेच्या दुप्पट

प्रेम करतो आपल्यावर
वडील म्हणजे एक अशी व्यक्ती,

जी तुम्हाला जवळ घेते,

जेव्हा तुम्ही रडता,

तुम्हाला ओरडते,

जेव्हा तुम्ही एखादी चूक करता,

तुमच्या यशाचा आनंद साजरा करते,

जेव्हा तुम्ही जिंकता,

आणि तुमच्यावर विश्वास ठेवते,

जेव्हा तुम्ही हरता,

हॅपी फादर्स डे!#बाबा वर कविताज्या माणसामुळे तुम्हाला दुनिया ही कळली,

त्याच माणसामुळे तुम्ही आयुष्याची अनेक वळण पाहिली,

कधीही सोडली नाही त्याने तुमची साथ,

कारण बाप असतोच जीवनाचा आधार,

पितृदिनाच्या शुभेच्छा!


माझे बाबा कविता


बाबा, तुम्ही आहात म्हणून

माझ्या अस्तित्वाला उपकारांची झालर आहे,

माझ्या यशाची चमक जेव्हा मला

तुमच्या डोळ्यात दिसते,

तेव्हा मी भरुन पावतो,

अशा माझ्या बापमाणसाला हॅपी फादर्स डे!


poem on father in marathi


शोधून मिळत नाही पुण्य,

सेवार्थाने व्हावे लागते धन्य,

कोण आहे तुझविणं अन्य?

‘बाबा’

तुजविण माझं जग आहे शून्य, हॅपी फादर्स डे!
 मुलगी असूनही कधीही मुलापेक्षा कमी न समजणारा,

स्वतःची झोप आणि भूक न विचार करता आमच्यासाठी झटणारा,

तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारा बाबा
vadil in marathi


माझ्या आयुष्यात जी श्रीमंती आहे,

ती केवळ तुमच्यामुळे आहे,

माझ्या जगण्याला अर्थ आहे,

तो केवळ तुमच्यामुळे आहे,

माझे जे अस्तित्व आहे ते केवळ तुमच्यामुळे आहे,

माझे संपूर्ण आयुष्य केवळ तुमच्या सेवेसाठीच आहे,

हॅपी फादर्स डे!माझे बाबा कवितादेव देवळात नाही,

तो माझ्या बाबांमध्ये आहे,

अशा माझ्या लाडक्या बाबांना

पितृदिनाच्या शुभेच्छा!


marathi kavita for father


काय हो बाबा इतक्या अडचणी आल्या,

तरी तुम्हाला मी काही रडताना पाहिले नाही,

कधीही ढासळून आमची साथ तुम्ही कधीही सोडली नाही,

घेऊन जबाबदाऱ्या तुम्ही झालात आमच्या जीवनाचे

बापमाणूस,

तुमच्या स्तुतीलाही आज शब्द अपुरे काय सांगू आज, हॅपी फादर्स डे!


father's day poem in marathiबाप हाच देव ।मायेचा सागर ।

 प्रेमाचे आगर । माझ्यासाठी... ॥ 

पकडले बोट । तात माझा गुरू ।

 आयुष्य हे सुरू । बापामुळे... ॥बाबांचे लाडाचे रुप म्हणजे मुलगी,

पण बाबा तुमच्या रुपाने मला मिळाला एक चांगला मित्र,

कोणी सोबत नसले तरी मला मिळावी तुमची साथ

बाबा म्हणून तुम्ही मला मिळावे जोपर्यंत असे आयुष्याची साथ

वडील म्हणजे अशी एक व्यक्ती

जी तुम्हाला जवळ घेते,

तुम्हाला ओरडते,

जेव्हा एखादी चूक तुम्ही करता,

तुमच्या यशाचा आनंद

साजरा करता,

आणि तरीही तुमच्यावर विश्वास ठेवते,

जेव्हा तुम्ही हरता,

हॅपी फादर्स डे!


वडिलांविषयी कविता


बाबा अचानक निघून गेला..

खूप बोलायचं राहूनच गेलं, व्यक्त व्हायचं राहून गेलं, 

बराच रागीट आणि तितकाच प्रेमळ बाबा, 

शिस्त लावणारा आणि मी लवकर घरी नाही आले तर काळजीने व्याकुळ होणारा,

लाडाने पिंट्या हाक मारणारा आणि मी चिडल्यावर त्याच्या चेहऱ्यावर दिसणारा तो आनंद आजही डोळ्यातून जात नाही,

मुलगी असूनही कधीही मुलापेक्षा कमी न समजणारा,

स्वतःची झोप आणि भूक न विचार करता आमच्यासाठी झटणारा,

तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारा बाबा,

तुमचा तो प्रत्येक गुण आणि दोष माझ्यात असल्याचा सार्थ अभिमान आहे,

तुमचं नाव माझ्या नावापुढे जोडल्याचा अभिमान आहे,

कोणीही कधीही तुमची जागा नाही घेऊ शकणार,

माझ्या प्रत्येक कामात विचारात श्वासात तुम्हाला घेऊन आजही मी ठाम आहे,

माहीत आहे तुम्ही परत नाही येणार पण माझ्या प्रत्येक गोष्टीत बाबा नक्की असणार,

ज्यांना असतो बाबा कदाचित त्यांना पर्वा नसते, पण खरंच सांगते, बाप हा बाप असतो,

वरून कणखर पण मनातून तो फक्त आपला असतो,

आजही लोकांच्या मुलांना बापाबद्दल बोलताना पाहून जीव गलबलतो,

वाटतं अजूनही अचानक डोक्यात टपली मारून माझी कळ नक्की काढेल बाबा,

ती माया, ते प्रेम, तो सहवास, मी दूर जाताना डोळ्यात आलेलं पाणी लपवण्याचा प्रयत्न कधी लपलाच नाही, 

माझ्यातून मी कधी तुम्हाला दूर होऊ दिलंच नाही, 

शेवटच्या क्षणीदेखील तुमचा हात घट्ट पकडला होता आणि अजूनही त्याच आधारावर आयुष्य काढायची ताकत तुम्ही दिलीत,

बाप नक्की कसा असावा तर तुमच्यासारखा…हॅपी फादर्स डे!

– दिपाली नाफडे..


वडीलांवर कविताकिती आश्चर्याची गोष्ट आहे ना..?

घरातल्या प्रत्येक गोष्टीसाठी भांडणारी भावंड

आपल्या आई वडीलांना

आपल्या सोबत ठेवण्यासाठी

कधीच नाही भांडत…
डोळ्यात न दाखवताही

जो आभाळाइतकं प्रेम करतो

त्याला वडील नावाचा

राजा माणून म्हणतात, हॅपी फादर्स डे!


baap kavita


बाबा तुमचा प्रत्येक शब्द,

माझ्या लक्षात आहे, बाबा

माझा प्रत्येक आनंद हा

तुमच्याशिवाय अपूर्ण आहे,हॅपी फादर्स डे!

आठवतं का बाबा सकाळी उठून तुम्ही मला पार्कात घेऊन जायचा,

माझ्यासोबत खेळता खेळता तुम्ही बाबाचे मित्र व्हायचा,

तोच मित्र मला हवा माझ्यासोबत कायम, लव्ह यू बाबाबापावर कविता


ज्यांचं न दिसणार प्रेम

आम्हाला भरभरुन प्रेम देतं,

अशा माझ्या वडिलांना,

हॅपी फादर्स डे!


baba kavita in marathi


प्रत्येक वेळी खाली पडल्यावर

जो मला उचलतो, तो माझा बाबा,

चुका केल्यावर ओरडतो,

पण तरीही सावरुन घेतो, तो बाबा असतो,

हॅपी फादर्स डे!


marathi kavita baba sathi


बाबा, दणकट बाहू आहेत तुमचे,

सांगा कसा बरं खाली पडेन,

तुम्हीच माझा आधारवड,

शेवटपर्यंत तुम्हाला मी जपेन,हॅपी फादर्स डे!


मराठी बाप


कोडकौतुक वेळप्रसंगी,

धाकात ठेवी बाबा,

शांत प्रेमळ कठोर,

रागीट बहुरुपी बाबा,हॅपी फादर्स डे!


baba var kavitaआपले दु:ख मनात लपवून,

संपूर्ण परिवाराची काळजी करणारा,

काही कमी नको पडायला म्हणून

स्वत:च्या इच्छा आकांक्षा मागे ठेवणारा,

असतो तो बापमाणूस, हॅपी फादर्स डे!


baba kavita in marathi text


आकाशालाही लाजवेल अशी उंची

आणि आभाळालाही लाजवेल असे,

कर्तृत्व असणारी एकमेव व्यक्ती म्हणजे ‘बाबा’,

हॅपी फादर्स डे!


baap poem in marathi


बाप आहे तोपर्यंत परिस्थितीचे काटे,

कधीच आपल्या पायापर्यंत पोहोचत नाहीत,

हॅपी फादर्स डे!


poem on dad in marathi


खिसा रिकमा असला जरी,

नाही कधी म्हणाले नाही,

माझ्या बाबांपेक्षा श्रीमंत,

मी कुणी पाहिला नाही, हॅपी फादर्स डे!


baba varun kavita


आम्ही आयुष्यभर सावली

राहावे म्हणून स्वत: आयुष्यभर,

उन्हात झिजला


बाप मराठी कविता संग्रह


कधी स्वत: उपाशी राहून,

आम्हाला अन्नाचा घास भरवला,

अशा आमच्या वात्सल्य मूर्तीला, हॅपी फादर्स डे!


short poem on father in marathiजग दाखवलं तुम्ही,

खेळायला शिकवलं तुम्ही,

हातात हात घेऊन चालायला

शिकवलं तुम्ही,

लहानपणी धाक दिला तुम्ही,

पण प्रसंगी प्रेमाचा हातही फिरवला तुम्ही

अशा माझ्या बाबांना हॅपी फादर्स डे!dad poem in marathiतो कधीही स्तुती करत नाही,

तो बढाई मारणारा नाही,

माझा बाप मला नको ती स्वप्न

दाखत नाही,

तो म्हणतो मेहनत कर

आणि खा कष्टाची भाकर

मगच तुला कळेल बाप होणं काय असतं,हॅपी फादर्स डे!baba var kavita in marathiमाझे बाबा आहेत प्रेमाचा एक अतूट झरा,

कधी रागावतात कधी चिडतात पण जवळही घेतात,

माझे बाबा आहेत एक सावली,

सतत सोबत चालणारी भासली नाही तरीही

आजुबाजूला जाणवणारी,हॅपी फादर्स डे!


quotes for dad in marathi


न बोलता प्रेम करतो,

न सांगता आधार देतो,

न थकता कष्ट करतो,

न दाखवता सहन करतो,

तो फक्त माझा बाप असतो, हॅपी फादर्स डे!dad quotes in marathiमाझे बाबा कविता


कितीही हो ओरडता बाबा,

आता त्याची किंमत कळते,

तुमच्यामुळेच आज प्रगती झालेली दिसते,

कायम असेच राहा पाठीशी, मिळतो तुमचा आधारआई वडील शायरी मराठीतुम्ही मला सतत ओरडता असे मला आधी कायम वाटायचे,

पण आता कळते त्या ओरड्यामागे तुमचे प्रेम किती दडलेले होते,

मी ही होईन असाच चांगला बाबा, पितृदिनाच्या शुभेच्छा!

बाबा हे अगदीच वेगळे रसायन असते,

त्याच्या ओरडण्याला काहीच सीमा नसते,

पण प्रेमाचा पूर आला तर मात्र प्रेमरसात बुडायला होते,

पितृ दिनाच्या शुभेच्छा!
बाबा घर तुमचे सोडून

कितीही दिवस झाले तरी,

तुमची आठवण आल्यावाचून राहात नाही,

बाबा तुमच्याशिवाय माझा एकही दिवस जात नाही.
माझी स्तुती करुन कधीही न थांबणारी

व्यक्ती म्हणजे ‘बाबा’

बाबा म्हणून तुम्ही मला लाभलात हे आहे माझे भाग्य

तुमच्याशिवाय नाही माझ्या आयुष्याला अर्थ,

बाबा तुम्हीच आहात माझ्या जीवनाचा खरा अर्थआई नाही म्हणते तेव्हा,

बाबा एकमेव हा म्हणायला असतो,

बाबा तुमची जागा मुलीच्या आयुष्यात कोणीही घेऊ शकत नाही,

माहीत आहे ना तुम्हाला… मग तुम्ही मला फोन का करत नाही.टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Comments